राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवारांनी विजयी उमेदवारांचा केला सत्कार
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
ब्रम्हपूरी शहरातील पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय करण्याकरिता हक्काची जागा मिळावी व शहरातील वाहतुकीला अडथळा न होता त्यांना आपला व्यवसाय करता यावा याकरिता ब्रम्हपूरी नगरपरिषदेने पथविक्रेता संघाची स्थापना केली आहे. त्या अनुषंगाने ब्रम्हपूरीतील नोंदणीकृत ४२१ सदस्यांकडुन विविध प्रवर्गातील ८ सदस्यांना निवडुन द्यायचे होते. याकरिता ब्रम्हपूरी नगरपरिषदेने निवडणुकीद्वारे ४२१ पथविक्रेत्यांमधून विविध प्रवर्गातील ८ सदस्यांची निवड केली. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित एकता पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.
यामध्ये ओबीसी प्रवर्गातुन रविंद्र पवार, सर्वसाधारण प्रवर्गातुन अमोल पाटील व भाऊराव भजगवळी, अल्पसंख्याक महीला प्रवर्गातुन इम्राना अंसारी, अनुसूचित जमाती प्रवर्गातुन बबलु मसराम हे विजयी झाले तर रमा डांगे व गिता मेश्राम ह्या काही मतांनी पराभूत झाल्या.
निवडुन आलेल्या काॅंग्रेस प्रणित एकता पॅनेलच्या उमेदवारांचा सत्कार राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीश वारजुरकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, माजी जि.प. सदस्य डॉ.राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा उपाध्यक्ष मुन्ना रामटेके, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, अतुल राऊत, साकिर शेख, निखील खोब्रागडे, स्वप्नील राऊत, योगेश बावणे यांची यावेळी उपस्थिती होती.

