prabodhini news logo
Home गडचिरोली मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’चे दोन लाख अर्ज प्राप्त

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’चे दोन लाख अर्ज प्राप्त

0
156

राहुल वसानिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली – गडचिरोली, दि.२६ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत २ लाख ६५९ महिलांनी अर्ज सादर केले आहे.

या योजनेसाठी ग्रामीण भागातून १ लाख ७९ हजार ७३१ तर शहरी भागातून २० हजार ९२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुकानिहाय अर्ज नोंदणीची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अहेरी-१०७०३, आरमोरी-११३१२, भामरागड-६६०५, चार्मोशी-३८००४, देसाईगंज-१२९३६, धानोरा-२२७८६, एटापल्ली-१६३७२, गडचिरोली-२९२४२, कोरची-९७४२, कुरखेडा-१६३१३, मुलचेरा-१२४११, सिरोंचा-१४२३३.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here