श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे 2 दिवसीय विभागीय अधिवेशन 17 आणि 18 ऑगस्ट 2024 रोजी हिगणघाट येथे आयोजित

0
74

ममता चेंबूलवार जिल्हा प्रतिनिधी वर्धा – वर्धा:- महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेल्या श्रमजींवी ग्रामीण पत्रकार संघाचे 2 दिवसीय प्रादेशिक अधिवेशन हिगणघाट येथे 17 आणि 18 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ठाकूर (सोनी) व सचिव इम्रान चिस्ती, राजेंद्र अंत करे कल्पना काळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.यासोबतच जेष्ठ पत्रकार व साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, ग्रामसेवक, डॉक्टरलोकांचे सत्कार करण्यात येणार आहे . तसेच महाराष्ट्रातील गरीब वयोवृद्ध महिला, पुरूष, अनाथ मुला-मुलींनायांना कपडे वाटप करण्यात येणार आहे. श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शेखइस्त्याक यांनी मागी ल ५तें ६ महिने पासून अथकश्रम केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागपूर, गढ चिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांतील तहसील, गावे आणि शहरांना भेटी देऊन पत्रकार संघाची कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. असुरक्षित नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम शेख इस्त्याक यांनी केले, हे पाहून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ठाकूर (सोनी) आणि इम्रान चिस्ती यांनी पुन्हा शेख इस्त्याक यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरून कार्यकर्ता ग्रामीण पत्रकार संघ बळकट करण्याची व नागरिकांच्या समस्या सोडविण्याची शपथ घेतली 17 आणि 18 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या पत्रकार संघाच्या अधिवेशनात या कार्यक्रमात सामील होण्याकरिता आहवान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here