prabodhini news logo
Home अकोला बोरगाव मंजू येथे बुद्ध वस्तीवर हल्ला – समाजाच्या संघटनेने प्रशासनाला वाकवले

बोरगाव मंजू येथे बुद्ध वस्तीवर हल्ला – समाजाच्या संघटनेने प्रशासनाला वाकवले

0
143

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – बोरगाव मंजू (ता. अकोला) येथे बुद्ध वस्तीवर काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी अचानक हल्ला करत गोटेमार केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, या प्रकरणात बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने पोलीस ठाण्यात उचलून नेण्यात आले व एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आले.

सिद्धार्थ नगर येथील शिक्षण घेत असलेल्या मुलांवर बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाळ यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. जेव्हा समाजातील नागरिक आपला अहवाल नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले, तेव्हा ठाणेदारांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “मी बौद्ध समाजाचा रिपोर्ट घेणार नाही.” यावरून समाजात तीव्र संताप निर्माण झाला.

याच रात्री आकाश शिरसाट यांनी फेसबुक लाईव्हद्वारे समाज बांधवांना आवाहन केले की, बोरगावमध्ये समाज धोक्यात आहे, सर्वांनी संघटित होऊन समाजाचे रक्षण करा. त्यानंतर अनेक भीमसैनिकांनी रात्रीतून समाज रक्षणासाठी पुढाकार घेतला.

दुसऱ्या दिवशी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन भेट घेण्यात आली. यात समाजाच्या निष्पाप तरुणांवर गुन्हे दाखल केले असून, दुसऱ्या गटातील लोक मोकाट फिरत असल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी एसपी साहेबांकडे योग्य न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

यानंतर, बोरगाव पोलीस स्टेशन गाठून ठाणेदारांना समाजावर झालेल्या अन्यायाची जाणीव करून देण्यात आली. समाज संघटित राहिल्याने प्रशासनाला मागे हटावे लागले आणि योग्य निर्णय देण्यास भाग पाडले गेले. निळ्या झेंड्याचा विजय या ठिकाणी स्पष्टपणे झाला.

या प्रसंगी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याचे आकाश शिरसाट, बौद्ध संघर्ष समितीचे जीवन डीग, गजानन कांबळे, अॅड. देवानंद गवई, महेंद्र डोंगरे, राजकुमार शिरसाट, सिद्धू शिरसाट, अॅड. प्रदीप गवारगुरु आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते, भीम आर्मीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जय भीम” चा नारा ठाण्यामध्ये ठणाणा करीत दुमदुमला. या संपूर्ण घटनाक्रमातून हे सिद्ध झाले की, जर समाज संघटित राहिला, तर कोणताही अन्याय थांबवता येतो. जय भीम नारा कोणीही दाबू शकत नाही. संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढा द्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here