
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – चंद्रपूर २९ जुलै – नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री. उल्हास नरड, सहाय्यक संचालक दीपेंद्र लोखंडे व नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मनपाच्या पीएम श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय येथे शुक्रवार २६ जुलै रोजी सदिच्छा भेट देऊन आज पर्यंत झालेल्या शिक्षण सप्ताह मधील उपक्रमांची माहिती जाणुन घेतली.
यावेळी मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले व शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर, त्यांनी विद्यार्थी, शिक्षकांशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या शाळेबद्दलच्या अनुभवांचे मत घेतले तसेच सर्व वर्गांना भेट देऊन प्रश्नोत्तराद्वारे विद्यार्थांची गुणवत्ता जाणून घेतली.














