prabodhini news logo
Home गोंदिया गोंदिया जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे, ती तात्काळ बंद करा

गोंदिया जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे, ती तात्काळ बंद करा

0
97

अन्यथा गोंदिया जिल्हा एनएसयूआई तर्फे तीव्र आंदोलन

गोंदिया प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गोंदिया – महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी आहे, मात्र असे असतानाही गुटखा विक्रेते बिनधास्तपणे सर्वत्र नियमांची पायमल्ली करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात रुग्णालय, शाळा, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठ आदी ठिकाणी बिनदिक्कतपणे गुटख्याची विक्री होत असल्याने सर्वसामान्यांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.गुटख्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. आमिर शेख जी यांच्या आदेशानुसार एनएसयूआई गोंदिया जिल्हाध्यक्ष अमन तिगाला, जिल्हा उपाध्यक्ष राहुल बावनथडे, शहर अध्यक्ष कृष्णा बिभार, तालुकाध्यक्ष वारिस भगत यांच्या नेतृत्वाखाली एनएसयूआई शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा गोंदिया जिल्हा एनएसयूआयतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शिष्टमंडळात जुनेद पठाण, रेहान शेख, सार्थक बोरकर, हर्ष ग्वालवंशी, मंथन बोपचे, सोमेल शहा, प्रतीक तनवाणी, पारस डोंगरे यांच्यासह एनएसयूआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here