आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
9022715116
गेल्या 5 महिन्या पासून बेवारस अवसतेथ फिरत असलेल्या एका मनोरुग्ण व्यक्तीचे प्रज्वल लटारे यांच्या कार्यामुळे पुनर्वसन झाले तो येईल ही आशा सोडलेल्या कुटूंबातील व्यक्तींनी त्याला पाहताच आनंद व्यक्त करीत प्रज्वलच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले 5 महिन्या पासून सुजित पदमाकर मोहोड हा बेवारस अवसतेथ फिरत असताना रुग्णमित्र प्रज्वल लटारे यानां हिंगणी येथून पोलीस पाटील मारोती चचाने यांनी कॉल केला की आमच्या हिंगणी गावाला एक मनोरुग्ण बेवारस अवसतेथ फिरत आहे माहिती मिळताच प्रज्वल लटारे यांनी त्याला मदतीचा हात देत स्वछ करून नीटनेटके करून त्याच्या घराचा शोध घेतला व प्रज्वल लटारे यांनी आपल्या रुग्णवाहिकेत एकात्मता नगर नागपूर त्याच्या राहत्या घरी शोध घेऊन पोहचविले यावेळी आशा सोडलेल्या घरच्यांनी मुलाला पाहुन आनंद व्यक्त केला तर 5 महिन्या नंतर मिळालेल्या आई वडिलांचे अश्रू अनावर झाले तेव्हा आई वडिलांनी मुलाची पूर्ण पूर्तता करून मुलाला आपल्या ताब्यात घेतले कुटूंबियांनी प्रज्वल लटारे याच्या कार्याचे कौतुक करीत तुम्ही साक्षात भगवंन्त रुपात येऊन माझ्या मुलाचे प्राण वाचवीले अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र प्रज्वल लटारे हे कुठेही अनाथ बेवारस अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला धावून जातात तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठूवुन जखमीचे प्राण वाचवितात त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

