धम्मनायिका बहुद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

0
403

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – नागपूर : धम्मनायिका बहुद्देशीय संस्था, नागपूर च्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५/०८/२०२४ ला सकाळी ८ ते १२ या वेळेत मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रूई (पांजरी), नागपूर येथे तेथिल गावातील ग्रामपंचायत प्रशासन च्या सहाय्याने आयोजित केले. संस्थेच्या वतीने तसे पत्र ग्रामपंचायत प्रशासन ला १५ दिवस आधी देण्यात आले होते व‌ ग्रामपंचायत प्रशासन चे सहकार्य आणि अनुमती रितसर घेण्यात आली होती.
अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कायदेविषयक शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही ग्रामस्थांना त्यांनी केले.

कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence), वैवाहिक मतभेद, घटस्फोटित महिलांच्या समस्या (Problems of Divorcee), महिलांचे हक्क व अधिकार, लहान मुलांच्या समस्या, लहान मुलांचे हक्क व अधिकार, (Women and Child rights) एकेरी पालकत्व, वारसा हक्क विषयी वाद, मृत्युपत्र, पॉवर ऑफ अटर्नी, (Power of atorny) कामगार व मालकांचे हक्क आणि कायदे, बौद्धिक संपदा हक्क व कायदा अशा विविध विषयांवर या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता तिडके व सचिव ॲड. विजया बागडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद गावाचे विस्तार अधिकारी श्री रवी परतेकी यांनी भुषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक राजीव मरोडीया , पोलिस पाटील नंदा डोंगरे व जिल्हा परिषद शाळा, रुई पांजरी, नागपूरच्या , मुख्याध्यापिका हेमलता बोरकर मॅडम, लाभले. कार्यक्रमाची सूरवात संविधानाचे प्रास्ताविक वाचून करण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविक चे वाचन ॲड.योगिता रामटेके यांनी केले तर कार्यक्रमा चे प्रास्ताविक भाषण संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता तिडके यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. ज्योती डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. सुनिता कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाला अनेक ग्रामस्थ उपस्थित होते व त्यांनी त्यांची प्रश्र्ने विचारून त्यांचे समाधान करून घेतले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य हजर होते. संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड. ज्योती वालदे, खजिनदार भाग्यश्री साखरे, ॲड. सुशीला बागडे, ॲड. चेतना ढोके, ॲड.कंचन वराडे इत्यादी सदस्य हजर होते. अतिशय उत्सावर्धक वातावरणात कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here