दाभोलकरांच्या हत्येमागील सूत्रधाराला कधी पकडणार?

0
149

प्रसारमाध्यमांना निवेदन

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विवेकी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात निर्घृणपणे खून करण्यात आला, या घटनेला आता अकरा वर्षे पूर्ण झाली. तरी अजूनही त्यांच्या खूनाच्या सूत्रधाराचा शोध लागत नाही व त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसच्या वतीने आज मंगळवार, दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7:30 वा. शिवाजी पार्क, दादर येथे निर्भय मॉर्निंग वॉक चे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर यांनी सांगितले की ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधाराला पकडले जावे यासाठी महाराष्ट्र अंनिस सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायदा देशभर लागू व्हावा यासाठी मा. पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याकडे आणि महाराष्ट्रात पोलीस महासंचालकांनी ‘प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्या’संदर्भात काढलेल्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी यासाठी सुद्धा महाराष्ट्रभर पाठपुरावा करत आहोत.’
या आंदोलनात मुंबईतील व आजूबाजूच्या परिसरातील महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते, समविचारी संघटना आणि हितचिंतक व मानवतावादी नागरिक सहभागी झाले होते.
डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार आणि या खूनांच्या सूत्रधाराला अटक कधी होणार? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here