prabodhini news logo
Home ठळक बातम्या डॉ. खंडू रघुनाथ माळवे उर्फ डॉ. खं र माळवे-खरमा यांना जीवन गौरव...

डॉ. खंडू रघुनाथ माळवे उर्फ डॉ. खं र माळवे-खरमा यांना जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित

0
88

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे जेष्ठ साहित्यिक खंडू माळवे उर्फ डॉ खं र माळवे-खरमा यांना या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव प्रात झाला आहे याही वर्षी जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक मा सुकृत खांडेकर यांचेहस्ते नुकताच देण्यात आला ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भूषविले उदघाटक मा प्रसिध्द साहित्यिक पत्रकार डॉ खं र माळवे-खरमा यांचेहस्ते करण्यात आले, स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले यावेळी पद्मश्री डॉ डी जी यादव डॉ रेसिक एंजल्स दै प्रहार चे संपादक डॉ सुकृत खांडेकर भानुदास केसरे प्रमोद महाडिक रामकृष्ण कोळवणकर, राजेश कांबळे, डॉ गॅन्सी अल्बुकर्क यांची भाषणे झाली यावेळी निवोदित कविंच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात साहित्यिक संपादकीय वैद्यकीय कला नाट्य नवोदित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना, पुरस्कार देवून गौरवण्यात आले, या कार्य क्रमांकाचे आयोजन नॅशनल लायब्ररी पी बी ई सोसायटी नाईट कॉलेज वर्ल्ड व्हिजन संस्था प्रा नागेश हुलवळे सर लेखक रमेश पाटील, प्रमोद सुर्यवंशी, योगेश हरणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here