
महामहीम राष्ट्रपतीला निवेदन
प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ – दि.२८/०८/ आदिवासी महिला आरती कोवे, मु.पिंपरी(दुर्ग)या. राळेगाव, जि.यवतमाळ, महाराष्ट्र राज्य हीचेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला या अत्याराची सी.या.डी चौकशी करून आरोपींना शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मा.जिल्हाधिकारी यवतमाळ याचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना महिला अत्याचार निवारण समिती जि.यवतमाळच्या वतीने निवेदन पाठवून सातत्याने बालीका, तरूण मुली आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवण्यात अशी मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे.
आदिवासी महिला आरती कोवे ह्या आदिवासी समाजातील असून तीचे वर झालेला अत्याचार हा अत्यंत कृर असा आहे.त्यामुळे तीला न्याय मिळाला पाहिजे जर अन्याय करणा-याला कडक शिक्षा झाली नाही तर महिला अत्याचार निवारण समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व न्याय मिळवून घेईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मनिषा तिरणकर, विद्या परचाके जयश्री मडावी, तारा कनाके, लियाकत शेख, लीला बोरकर, प्रियंका करपते, ज्योती कुडमेथे, यशोदा कोराटे, छाया कुरसंगे, सविता नाईक, सुमन बोबडे, अनिता गवराने, वैशाली आत्राम, गंगू पिंपळकर, शोभा आत्राम, दुर्गा टेकाम, वंदना कासार, लीला कोराटे, कल्पना देवकर, सुशीला झिबले, अंजना आत्राम, मंदा डबकर, कनाके सर, मोबिन शेख, दीपक कोंपिलवार हे उपस्थित होते.














