prabodhini news logo
Home चंद्रपूर टीम हिफाजत-ए-ईमान बल्लारपूर तर्फे आयोजित धरना प्रदर्शनास सर्व धर्माच्या लोकांचे समर्थन

टीम हिफाजत-ए-ईमान बल्लारपूर तर्फे आयोजित धरना प्रदर्शनास सर्व धर्माच्या लोकांचे समर्थन

0
125

बल्लारपूर प्रतिनिधी – दि .05/09/2024 रोजी 1 सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे आयोजित सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात भाजप आमदार निताश राणे यांनी मुस्लिम धर्मासंदर्भात विवादित टिप्पणी केली. त्यांनी मुस्लिमांना थेट मस्जीद मध्ये घुसून मारण्याची भाषा केली. राजकिय नेत्यांना अश्या वक्तव्याने हिंदू-मुस्लीम एकतेत तेढ निर्माण होऊ शकतो. नितेश राणे तसेच रामगिरी महाराज सारख्या व्यक्तीचे विवादास्पद वक्तव्य संविधान विरोधी आहेत असे म्हणत टिम हिफाजत-ए-ईमान बल्लारपूर ने सय्यद अफजल अली च्या नेतृत्वात शहरातील नगरपरिषद चौकात धरना प्रदर्शन केले. या धरना प्रदर्शनास शहरातील विविध संघटना तसेच सर्व धर्मातील नागरिकांनी समर्थन केले. या प्रदर्शनास अब्दुल करीम, शाहिद शेख, ईस्माईल ढाकवाला, सरफराज शेख, आसिफ हुसेन शेख, आसिफ शेख, तसेच सर्व मस्जिदांचे इमाम उपस्थित होते. सोबतच भारत थुलकर, प्रा.नागेश्वर गंडलेवार , सिक्की यादव, बादल उराडे, घनश्याम मुलचंदानी, पापा आर्या, सय्यद मुकद्दर, रेखा भोगे, गीताताई, तझिन कुरेशी , मुकद्दर खान, मुन्ना भाई, अरबाज भाई राजूरा सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here