नाशिक प्रतिनिधी – “मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा विद्यालयात आज हिंदी दिन साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने सरस्वती माता प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
हिंदी दिनानिमित्त विद्यालयातील नंदिनी थोरमिसे,तेजस उफाडे,ओमकार गायकवाड,गायत्री वटाणे,धनश्री जाधव, दिया खानखुरे,नताक्षा वडजे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषेचे कार्य सांगितले.विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजीव पठाडे, संजय जाधव, विठ्ठल ढिकले, सविता भोये यांनी, “भारताची राष्ट्रीय भाषा हिंदीचे आपल्या जीवनातील महत्व आपल्या मनोगतातून विषद केले.
याच दिवशी हिंदी ला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला,त्यामुळे नक्कीच आज जगभरात हिंदीचा बोलबाला होऊन तिचे महत्व वाढत आहे.असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी सांगितले.
हिंदी दिनानिमित विद्यालयात इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून उत्कृष्ठ निबंध लिहीणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन 8 वी क चे वर्गशिक्षक श्री.संजीव पठाडे यांच्या मार्गदर्शनाने उत्तम रित्या केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *प्रियंका भुसाळ,रितिका भोई* यांनी संयुक्तपणे केले तर आभार *संस्कृती गांगुर्डे* हिने मानले.

