prabodhini news logo
Home ठळक बातम्या पुण्यातील महागणपतींची मोरया कलावंतांच्या हस्ते महाआरती संपन्न.

पुण्यातील महागणपतींची मोरया कलावंतांच्या हस्ते महाआरती संपन्न.

0
271

मोरया कलावंत आयोजित कलाकारांच्या हस्ते पुण्यातील महागणपतीची महाआरती २०२४

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती,भाऊसाहेब रंगारी गणपती, शारदा गजानन मंडई गणपती, कसबा मानाचा पहिला गणपती, तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, व केसरी वाडा गणपती या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील सिनेकलाकार व तंत्रज्ञ मोठ्या संख्येत हजर राहून सद्या मोत्याप्रमाणात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवून “महिला सुरक्षा राष्ट्र व्हावा” व आपले व सर्वांचे आई-बहीण सुरक्षित राहवो असे कलाकारांनी बाप्पा चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले व महाआरतीचा लाभ घेतला.

महाआरतीचे आयोजन मोरया कलावंत च्या संस्थापक कुणाल देशमुख, श्रीकृष्ण भिंगारे, प्रशांत बोगम, शुभम मोरे, राज चमरे आदी यांनी केले असून महाआरती करीता प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी बिग बॉस मधील महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा पुढारी घनश्याम दरवडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, ज्येष्ठ अभिनेते सुनील नाना गोडबोले, अभिनेत्री आर्या घारे, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेत्री ओजस्वी कोंडरे, तसेच ओमकार साखरे, हर्षल पवार, ओंकार जाधव, प्रणव देवधर, शीतल पाटील असे ५० हुन अधिक चित्रपट व मालिकातील कलाकारांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here