या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
औसा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल १०,०००/- रु भाव देण्यात यावा या मागणीसाठी औसा तहसील कार्यालय समोर आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष राम वसंतराव सुर्यवंशी व बिभीषण प्रयागबाई शाहुराज कदम तालुकाउपाध्यक्ष यांनी दिनांक १७ सप्टेंबर२०२४ रोजी पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री यांनी लेखी स्वरुपात उपोषण स्थळी येऊन हमी द्यावी. गेली अनेक वर्षे देशातील शेतकरी आपल्या मागणीसाठी सातत्याने आदोलन करीत आहेत. परंतू सरकार याकडे डोळे झाक करीत आहे. भारत देश हा कृषी प्रधान देश असून सुध्दा येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या गिनीज बुक ऑफ रेकडे झालेल्या आहेत. शेतकरी सुखी तर जग सुखी पण सरकारकडून त्याची दखल नाही.
उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे त्याची झळा शेतकरी सोसतोय.
मस्तवाल सरकार भांडवलदार उद्योगपतींचे चोचले पुरवण्यात मस्त आहे. आम्ही
मात्र देशोधडीला लागलो आहे याचं त्यांना काही देणे घेणे नाही. अशा सुलतानी राजवटी विरोधात आज देशात शेतकरी चळवळी कार्यकरत आहेत. त्या चळवळी बळकट व्हाव्यात व शेतकयांच्या कष्टाला न्याय मिळावा म्हणून आमचे अन्नत्याग उपोषण कामी यावे.
त्वरीत मागणी मंजूर व्हावी यासाठी औसा तहसील समोर दिनांक १७सप्टेंबर २०२४ रोजी पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण असून तमाम शेतकऱ्यांच्या चळवळीला समर्पित असेल.अशी मागणी घेऊन आज त्यांनी औसा तहसील कार्यालय समोर अन्यत्याग उपोषण करीत आहेत त्यांचा आज उपोषणाचा 2 रा दिवस आहे.या मागणीसाठी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

