सुभाष जावळे पाटील यांना जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार
विवाह न करणारे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा जाहीर पाठिंबा
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संचलित गौरक्षक सेना परभणी च्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्या तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी प्राणांतीक उपोषणाला बसणारे मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ मराठा योध्दा सुभाष दादा जावळे पाटील हे दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून प्राणांतीक उपोषणाला बसलेले यांच्या उपोषणाला यांच्या विविध मागण्या मराठा आरक्षण तात्काळ निर्णय घ्या यासाठी पहिली मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्नसुटत नाही तोपर्यंत इ डब्लू एस चे आरक्षण समाजाला पूर्ववत चालू ठेवावे. निजाम कालीन गॅजेट ग्राह्य धरून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. मुलीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मुलांना देखील सर्व शिक्षण मोफत देण्यात यावे. महाराष्ट्रात कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अशा मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात येऊ नये. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ च्या जाचक अटी रद्द करून कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर कठोर कारवाई करावी. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मुला व मुलीसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीग्रहची तात्काळ उभारणी करण्यात यावी. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर उभारावे यांच्यासह अनेक विविध मराठा आरक्षणाच्या व इतर मागण्या तात्काळ अमलबजावणी घेऊन निर्णय घ्यावा यासाठी प्राणांतीक उपोषणाला बसलेले सुभाष दादा जावळे पाटील यांना पाठिंबा देणारे वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्र जन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा गौरक्षक सेना महाराष्ट्र महामंत्री प्रभारी गोसेवा वारकरी सेवक स्वच्छतादुत वृक्षमित्र श्रीमंत लखुजीराजे जाधव यांचे वंशज नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान मराठा आरक्षण संघर्ष समिती उपोषण स्थळ या ठिकाणी भेट देऊन व पाठिंबा देण्यात आला याप्रसंगी कुणबी मराठा समाजाचे नेते नितीन रनेर मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर काका शिंदे संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच संघटनेचे मराठवाडा विभागाचे संघटक शेख भाई सरफराज त्यांच्यासह बहुसंख्य मराठा समाज व सामाजिक संघटना पदाधिकारी व डॉक्टर वकील इंजिनियर महाराज मंडळी वारकरी इतर समाजिक कार्यकर्ते सर्व पत्रकार वृत्तपत्र संपादक छायाचित्रकार उपस्थित होते अशी माहिती जोपर्यंत मराठा आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत विवाह न करणारे युवा मराठासेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

