prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायतला माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत नागपूर विभागातून तृतीय व राज्यातून...

सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायतला माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत नागपूर विभागातून तृतीय व राज्यातून 24 क्रमांक मिळाला

0
89

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युजसिंदेवाही – महाराष्ट्र शासना तर्फे माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सिंदेवाही लोणवाही नगरपंचायतला नागपूर विभागातून तृतीय व राज्यातून 24 क्रमांक पटकावला. सदर अभियानात एकूण 414 स्थानिक स्वराज्य संस्थानी सहभाग नोंदविला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेनी अभियानाच्या कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यांकन व फिल्ड मुल्यांकन यंत्रणे मार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाने पर्यावर संवर्धन व संरक्षण उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये निसर्गाच्या पंच महाभूतीतील भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने माझी वसुंधरा अभियान 4.० यशस्वी करण्यासाठी राहुल कंकाळ, मुख्याधिकारी, भास्कर नन्नावार अध्यक्ष, स्वप्निल कावळे माजी.अध्यक्ष, पुजा विलास रामटेके उपाध्यक्ष, मयूर रमेश सुचक माजी. उपाध्यक्ष, श्री दिलीप भिवाजी रामटेके सभापती सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती, पंकज प्रभुदास नन्नेवार,सभापती पाणीपुरवठा समिती , वैशाली संजय पुपरेड्डीवार उपसभापती महिला व बालकल्याण समिती, मिनाक्षी संजय मेश्राम, शाम परमानंद छत्रवाणी, अमृत भास्कर मडावी, अंजू नरेंद्र भैसारे, निता भगवान रणदिवे, श्वेता संजय मोहुर्ले, अस्मिता जुमनाके , अपूर्वा चिंतलवार, किशोर भरडकर, .दीपा पुस्तोडे, सुनील उटटलवार, युनूस हबीब शेख, सुरज गायकवाड, मनोज आंबोरकर ,  चंद्रशेखर दोड, विनोद काटकर,  संदीप कांबळे, सुधिर ठाकरे, अनिकेत मानकर , संजय वाकडे, संजय रामटेके, सुधाकर निकुरे , संजय बोंडगुलवार नंदू सरवरे, चेतन राऊत , राजेंद्र नन्नावरे, संगीता कम्बलवार, गीता नागपुरे, प्रीतम खोब्रागडे, दिलेश सहारे, प्रफुल वाकडे, भूपेश मेश्राम, आकाश ठाकरे आणि सर्व नगरपंचायत अधिकारी / कर्मचारी तसेच सफाई कामगार यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here