
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४)- धुळे दिनांक:-०४/१०/२०२४ भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील दिनांक २३ मार्च २०२४ रोजी माननीय प्रधान सचिव दिनेश वाघमारे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई हे दौऱ्यावर आले असताना त्यांना महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेच्या प्रदेशअध्यक्ष श्री गिरीषभाऊ चौधरी यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते त्यामध्ये प्रमुख मागणे कर्मचारी भरती आणि संस्थेतील असलेल्या १४ लिफ्ट या गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बंद असल्याने त्या तात्काळ दुरुस्त करण्यात यावा जेणेकरून आपात्कालीन रुग्णसेवेसाठी किंवा रुग्णांच्या शस्त्रक्रिया साठी/प्रस्तुतीसाठी नेण्या व आणण्यासाठी अडचणी निर्माण होतात याकरिता माननीय प्रधान सचिव वाघमारे यांनी मा.अधिष्ठाता डॉ.सयाजीराव भामरे सरांना तात्काळ प्रस्ताव सादर करा.
अशा प्रकारे सूचना दिल्या व त्या संदर्भात दिनांक १३/०८/२०२४ रोजी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला व त्याच्यावर तात्काळ दखल घेऊन १४ लिफ्ट या नवीन बसवण्याची मंजुरी देण्यात आल्याबद्दल मा. आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग व प्रशासनाचे तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मा. अधिष्ठाता डॉ भामरे सर व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे लघुवेतन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चौधरी यांनी मनापासून आभार मानले














