
आंबेडकर नगर वासियांनि मानले आप’ पार्टीचे आभार
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर: बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर, ज्याला मुख्यत्वे दलित वस्ती म्हणून ओळखले जाते, हा भाग अनेक वर्षांपासून विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. विशेषतः, दलित विकास निधीच्या वापरात हा प्रभाग अनेकदा दुर्लक्षित करण्यात आला होता. मात्र, ‘आम आदमी पार्टी’चे (आप) युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी या समस्येकडे मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
आंबेडकर नगर येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुख्य मार्गावर असलेल्या नाल्यावर पुलियाची सुविधा नसल्यामुळे त्यांना लांबून फेरी मारून जावे लागत होते. वारंवार नगरसेवक आणि मनपा प्रशासनाकडे विनंती करूनही नागरिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आंबेडकर नगरमधील नागरिकांनी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली.
राजू कुडे यांनी तत्काळ याची दखल घेत, मनपा अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करून पुलियाच्या बांधकामाला मंजुरी मिळवून दिली. या यशस्वी पाठपुराव्यामुळे आंबेडकर नगरच्या रहिवाशांनी ‘आप’ पार्टीचे आभार मानले आहेत.
या कामाचे भूमिपूजन आंबेडकर नगरमधील स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात राजू कुडे यांच्यासह आपचे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. उपस्थितांमध्ये युवा संघटनमंत्री मनीष राऊत, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत रामटेके, वाहतूक शहर अध्यक्ष जयदेव देवगडे, युवा जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, युवा कार्यकर्ता सागर बोबडे, अजय बाथव, तसेच वॉर्डातील अनेक नागरिकांचा समावेश होता.














