prabodhini news logo
Home ठळक बातम्या युवासेना व क्यूमाईन वि.क्रीडा मंडळ तर्फे ऐतिहासिक हॉलीबॉल स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न.

युवासेना व क्यूमाईन वि.क्रीडा मंडळ तर्फे ऐतिहासिक हॉलीबॉल स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न.

0
217

धुळे युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी यांच्या टीमचे धुळेकरांनी केले कौतुक

धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) – धुळे दि. ०८/१०/२०२४ युवासेना शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा युवासेने व क्युमाईन विविध क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने खुल्या हॉलीबॉल स्पर्धेचे जिल्हास्तरीय आयोजन दिनांक ५ व ६ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, क्युमाईन क्लब धुळे अध्यक्ष डॉक्टर बी.बी.माळी,युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियंका जोशी,युवासेना धुळे जिल्हा विस्तारक नदीम सय्यद,क्युमाईन क्लब धुळे उपाध्यक्ष पी.जी. सुतार,शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, शिवसेना धुळे शिवसेना सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी,जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे,इंजि.कैलास शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे,पोपटराव सूर्यवंशी,महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन, शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी, महिला संघटिका हेमा हेमाडे,संगीता जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तरुणांमध्ये मैदानी खेळाप्रती आवड निर्माण व्हावी तसेच युवा पिढी शिक्षणासोबत शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व सशक्त निर्माण होण्याच्या उदात्त हेतूने युवासेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धुळे जिल्हा युवासेना प्रमुख हरीश माळी यांनी धुळे जिल्हा युवा सैनिकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्यातील नामावंत हॉलीबॉल आजी व माजी खेळाडू यांच्या मार्गदर्शनाने तसेच क्युमाईन विविध क्रीडा मंडळांच्या मदतीने सदर भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.सदर स्पर्धेत अनेक नामवंत हॉलीबॉल खेळाडूंनी सहभाग घेतल्याने क्युमाईन क्लब धुळे येथील मैदान स्पर्धेच्या दोन्ही दिवशी मोठ्या संख्येने भरले होते.रोमहर्षक स्पर्धेच्या सामन्यांनी धुळेकरांचे मनोरंजन तर झालेच याशिवाय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चहात्यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने सर्वच सामने अत्यंत चुरशीचे झाले.स्पर्धेत सहभाग घेतलेले संघ,उत्तर महाराष्ट्रातील विविध शहर व गावे येथून स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी विविध संघांनी दिलेल्या प्रतिसाद,सदर स्पर्धेत विविध संघात नामवंत हॉलीबॉल पटू यांनी घेतलाला सहभाग तसेच मुलींच्या पण संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला या सर्व बाबी पाहता सदर स्पर्धा ही धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक हॉलीबॉल स्पर्धा असल्याचे मत अनेक जाणकारांकडून यावेळी व्यक्त झाले.स्पर्धा दोन प्रकारात घेण्यात येत असल्याकारणाने दोन वेगळे सुसज्ज मैदाने एकाच वेळी आयोजकांमार्फत उपलब्ध करून देण्यात आले होते. स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील विविध शहर व गावे येथून तब्बल ४३ संघांनी सहभाग घेतला होता त्यात मुलींच्या ४ संघांनी पण सहभाग नोंदवला होता त्यामुळे सदर स्पर्धा ही लक्षणीय ठरली. सदर स्पर्धेचा अंतिम निकाल ६ ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजता लागला.पासिंग हॉलीबॉल प्रकाराच्या स्पर्धेत क्युमाईन क्लब संघाने प्रथम क्रमांक मिळवून तब्बल ११ हजार रुपयांचे रोखासह भव्य चषक जिंकला. तर द्वितीय क्रमांक डी डी सी धुळे या संघाने मिळवून रोख रक्कम ७००० सह भव्य चषक जिंकला.तसेच सॉटी ( ढकली ) प्रकाराच्या हॉलीबॉल स्पर्धेत मालेगाव येथील स्वराज ए संघाने प्रथम क्रमांक मिळवत 11000 हजार रुपयाच्या रोखीसह भव्य चषक जिंकला. तर द्वितीय क्रमांक मालेगाव स्वराज बी संघाने मिळवून ७००० रोख रकमेसह भव्य चषक जिंकला.धुळ्याच्या सुयोग नगर संघ,जय भद्रा संघ,नेताजी क्लब संघ यांनी अत्यंत उत्कृष्ट खेळ दाखवीत प्रेक्षकांसह धुळेकरांची मने जिंकली. त्यामुळे आयोजकांकडून या संघांचाही सन्मान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रास वाव मिळण्यासाठी धुळे जिल्हा युवासेना मागील काही वर्षांपासून सातत्याने उत्कृष्ट काम करीत आहे. धुळे जिल्हा युवा सेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख हरीश माळी हे एक नामवंत मल्ल असून अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय कुस्ती व जुडो स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदविला असल्याने त्यांच्या उपक्रमांमध्ये नेहमीच क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी धडपड दिसत असते. धुळेकरांनी सदर हॉलीबॉल स्पर्धेत उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने सर्व आयोजकांचे स्पर्धा भरवण्यासाठीचे मनोबल प्रबळ झाल्याने आगामी काळात इतरही खेळांच्या भव्य स्पर्धांचे आयोजन होईल अशी आशा धुळेकर या भव्य स्पर्धेकडे पाहून व्यक्त करीत आहेत.स्पर्धेचा यशस्वीतेसाठी धुळे जिल्हा युवासेनेचे पदाधिकारी यांच्यासह क्युमाईन क्लब धुळे हॉलीबॉल असोसिएशन यांच्यासह विविध क्रीडा मंडळांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आयोजकांकडून जाहीर आभार मानण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी,युवासेना जिल्हा समन्वयक मोहित वाघ,युवती सेना विस्तारक सोनी सोनार,युवा सेना जिल्हा प्रसिद्ध समन्वयक सिद्धेश नाशिककर,शहर संघटक जयेश फुलपगारे, महानगर प्रसिद्ध प्रमुख जयेश फुलपगारे,विधानसभा क्षेत्र प्रमुख तरबेज शेख,युवासेना पदाधिकारी धनंजय पाटील,केतन भामरे,कृष्णा जाधव व क्यूमाईन क्लब व्हॉलीबॉल असोसिएशन आदींनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here