prabodhini news logo
Home ईगतपुरी निष्टावंत कार्यकर्ते हो,तुम्ही उचला सतरंज्या,सत्तापदे भोगुनही नेते मात्र मोकाट

निष्टावंत कार्यकर्ते हो,तुम्ही उचला सतरंज्या,सत्तापदे भोगुनही नेते मात्र मोकाट

0
274

ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – एकेकाळी राजकारण विचाराचें होते, तत्वाचे होते.पण हल्ली ऊठसुठ संविधान संविधान करणारे नेतेही निर्लज्जपणे विचार, तत्व सगळे सोडुन सत्ताकारणासाठी मोकाट सुटल्याचे चित्र आहे. निष्ठावान कार्यकर्ते बिचारे आयुष्यभर विचाराचीं मुल्ये जोपासत कुठलीही अपेक्षा न बाळगता सतरंज्या उचलतात.तर निर्लज्ज नेते मात्र कार्यकर्ते,पक्ष व जनता या सगळयानां तिलांजली देत मोकाट सुटल्याचे चित्र दिसत आहे.
दिल्लीत जे घडते आहे ते आता गल्लीतही घडतानां दिसत आहे.
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर यांनी पाच वर्षापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ची साथ सोडुन कॉंग्रेस चा हात धरला होता.हा हात सुदैवी ठरुन ते आमदार ही झाले होते. पण ज्या पक्षाने आमदार केले त्याच पक्षाची साथ ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडत त्यांनी घडयाळ हातात बांधले आहे.यामुळे कॉंग्रेस पक्षावर पुन्हा नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
यापुर्वी ही कॉंग्रेस पक्षाकडुन आमदार झालेले शिवराम झोले व सौ.निर्मला गावित यांनीही आमदारकी मिळाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्टी दिली होती.
माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे शिवसेनेचा भगवा हाती घेऊन आमदार झाले होते.मात्र ज्या पक्षाने आमदार केले त्या शिवसेनेला बाय करत मनसेचे इंजिन पकडले होते.
विशेष म्हंणजे या सर्वच माजी आमदारानीं जनतेला गृहित धरत जेव्हा जेव्हा पक्ष सोडुन पक्षातंर केले, तेव्हा तेव्हा जनतेनेही या नेत्यानां धडा शिकवला.मात्र तरीही या पासुन बोध न घेता या नेत्याच्यां कोलांट्याउड्या सुरुच आहेत.
ईगतपुरी तालुक्यात कै.गोपाळराव गुळवे, माजी आमदार कै.पुंजाबाबा गोवर्धने, कै.मुळचंद भाई गोठी असे जुन्या पिढीतील नेते होते.ज्यांनी आयुष्यात अनेक प्रलोभने येऊन देखील कधीही पक्ष बदलला नाही.मात्र हे नेते काळाच्या पडद्याआड गेले असुन त्यांच्या आदर्शानांही आता कोणी हिंग लावुन विचारत नाही.हे नेते फक्त जयंती,पुण्यतिथी पुरतेच आठवतात.एरवी या नेत्याचें सगळयानां विस्मरण झाले आहे.
अनेक नेत्याचें तर कित्येक वेळा पक्ष बदलुन झाले आहेत, कि आता नव्याने जाणेसाठी कुठला पक्ष ही या नेत्यांनी शिल्लक ठेवलेला नाही.
निष्ठावान कार्यकर्ते मात्र पक्ष, नेते सांगेल त्या प्रमाणे काम करणे, सतरंज्या उचलने आणि विचारधारा तथा तत्वासाठी आयुष्य संपवण्यात धन्यता मानत आहे.काल ज्याला विरोध केला आज त्याचेच स्वागत करण्याची नामुष्की या बिचार्यावर येते आहे.
या अनैतिक राजकारण व राजकारण्यानां स्वच्छ धुवुन काढण्याची गरज असुन सुदृढ लोकशाहीचे हे विकृत रुप पाहुन विचारवंत व जागरुक लोकाचां संताप होतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here