श्रीरामपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- आज दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी बहुजन भीम पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन बरेच बहुजन समाजातील लोक यामध्ये सामील होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव राजेंद्र अनाप सर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष यांचे सहसचिव भारत चक्रनारायण साहेब हे होते कार्यक्रमाला उपस्थित उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाबासाहेब मोकळ साहेब, महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जयश्रीताई भोसले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुकद्दर भाई खाटीक, कोपरगाव तालुका संघटक आत्माराम हिंगमिरे, महिला आघाडी चासनळी शाखा अध्यक्ष छायाताई मोरे, श्रीरामपूर तालुका मुख्य महासचिव रसूल भाई सय्यद, संजय गायकवाड, हिरामण बारसे, श्रीरामपूर तालुका संघटक संजय गायकवाड, श्रीरामपूर तालुका संपर्कप्रमुख संदीप कसबे, आदी भीमसैनिक उपस्थित होते.

