सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माळी समाज लोकसंख्येच्या मानाने बहुसंख्य आहे. आजपर्यंतच्या एवढ्या इतिहासामध्ये माळी समाज एवढ्या बहुसंख्येने असतानाही आमच्या समाजाला आजपर्यंत ब्रम्हपुरी व बल्लारपूर विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. परंतु आता बहुजनांच्या नेत्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे या बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकरिता काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागत आहेत.
सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व माळी समाज संघटनेच्या वतीने मान. विजयभाऊ वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते यांना विनंती करण्यात येते की, आज पर्यंत हा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला व पुढेही राहील आणि निवडणुकीच्या प्रत्येक वेळी काँग्रेस पक्षाला सहकार्य केलेल आहे.
करिता बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची काँग्रेसची सीट डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना मिळावी. याकरिता पाठपुरावा करावा. जर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये डॉक्टर अभिलाषा गावतुरे तिकीट न मिळाल्यास नाईलाजाने समाज वेगळी भूमिका ब्रम्हपुरी विधानसभा मध्ये घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

