
सर्वांनी मिळून 100% मतदान करावे असे समाजकार्य महाविद्यालयाचे आव्हान
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली हे महाविद्यालय आणि त्यात शिकणारे विद्यार्थी नेहमी सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने भाग घेत असतात. सर्वेक्षणातून आपल्याला बघायला मिळते की स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष लोटूनही फक्त ६०-६५% नागरिक मतदानाचा अधिकार बजावतात, तर बाकी फक्त बघ्याची भूमिका घेतात. हे वास्तव्य कुठेतरी बदलावे आणि सर्वांनी १००% मतदान करावे, याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एस.आर.एम. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री कापसे यांच्या नियंत्रणाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. संतोष आडे सर यांच्या मार्गदर्शनात दिनांक २२ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरूवारला महाविद्यालयामध्ये तसेच चंद्रपूर बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलतांना, “संविधानाने दिलेल्या अधिकाराचे योग्यरीत्या वापर करून उचित लोकप्रतिनिधी निवडणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकांनी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजुन मतदान करावे”,असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री कापसे मॅडम यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. ममता ठाकुरवार, प्रा. विश्वनाथ राठोड, प्रा. डॉ. किरणकुमार मनुरे, प्रा. डॉ. सुभाष गिरडे, माजी विद्यार्थी प्रेम जरपोतवार, विक्रम बोढे उपस्थित होते. या अभियानामध्ये समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती आणि शिव्यामुक्त अभियान या आधारित पथनाट्य आणि तर विशाल टेंभुर्णे यांनी नृत्याद्वारे जनजागृकता केली. या पथनाट्यात महाविद्यालयीन विद्यार्थी कुंदन खोब्रागडे, हेमंत मेश्राम, नयन आत्राम, रोहित देवतळे, सुमेध बक्षी, मोरेश्वर मडावी, तन्वी झाडे, विघ्नेश्वर देशमुख, साक्षी कातलाम यांनी सहभाग घेतला.














