सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर- चंद्रपुर – महाराष्ट्रातील ग्रा. पं. मध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या उर्जानगर ग्रा. पं. चे भाजपा महायुतीचे उपसरपंच अंकितराव चिकटे यांनी आज दि. 07 नोव्हेंबर 2024 रोज गुरुवार ला दू. 01:00 वा सरपंच पदाचा प्रभार स्वीकारला.
यावेळी उर्जानगर ग्रा. पं. प्रभारी सरपंच अंकितराव चिकटे यांचे भाजपा जिल्हा महामंत्री मा. रामपालभैया सिंग, भा ज पा तालुका अध्यक्ष मा. हनुमान काकडे, शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख मा. संतोषजी पारखी, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनिताताई भोयर, तालुका महामंत्री व माजी पं. स. सभापती केमाताई रायपुरे, माजी जि. प. सदस्य विलासबाबू टेंभूर्णे, माजी जि. प. सदस्य हनुमान चौखे, माजी पं. स. सदस्य संजय यादव, माजी पं. स. सदस्य पंकज ढेँगारे, राष्ट्रवादी कांग्रेसचे संजय शेजूळ, संदीप बिसेन, फारुख शेख, नामदेव आसुटकर, देवानंद थोरात, हरीश व्यवहारे, ग्रा. पं. सदस्य मदन चिवंडे,ग्रा. पं. सदस्य अभिजीत खन्नाडे व सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यानी नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

