महायुतीचे उमेदवार मा. किशोर जोरगेवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभा

0
195

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती..!

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – येथील चंद्रपुर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, शिवसेना, रिपाई (आठवले), पीरिपा (क़वाड़े) व मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. किशोरभाऊ जोरगेवारांच्या प्रचारार्थ आज दिनांक 09/11/24 रोज शनिवारला दूपारी 01 वाजता कोहिनूर तलाव, चंद्रपुर येथे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या भव्य जाहीर सभेत मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे सोबत मिळून महाराष्ट्रद्रोही विरोधकांना कामातून उत्तर देवून विविध जनकल्याणकारी योजनेतून सर्व समावेशक कार्य केल्याबद्दल 71-चंद्रपुर विधानसभेचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. किशोर जोरगेवारांना महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान मा. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख मा. संतोष पारखी यांच्या नेतृत्वात शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनल आत्राम, शिवसेना वाहतुक व वैद्यकीय जिल्हा प्रमुख मा. अरविंदजी धिमान, घूग्घुस शहर प्रमुख मा. महेशजी डोंगे, बल्लारपुर विधानसभा संघटीका क्रिष्णा सुरमवार, उप तालुका प्रमुख सुरेश खापर्डे, युवासेना महानगर प्रमुख दिपक रेड्डी, नगरसेवक मा. नानाभाऊ दुर्गे, विश्वास शेंडे, महिला आघाडी भद्रावती तालुका प्रमुख योगिता घोरुडे, उप तालुका प्रमुख राधा कोल्हे, उपशहर प्रमुख सविता तरारे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here