prabodhini news logo
Home चंद्रपूर लुटारूंची टोळी मानगुटीवर बसल्याने महाराष्ट्राचे वाटोळे झाले – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

लुटारूंची टोळी मानगुटीवर बसल्याने महाराष्ट्राचे वाटोळे झाले – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
153

पळसगावच्या प्रचार सभेत वडेट्टीवार यांचा महायुतीवर हल्लाबोल

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करतं भाजपने पक्ष फोडीचे निच राजकरण केले. जनावरांच्या खरेदी – विक्री प्रमाणे खोके देऊन आमदार विकत घेत भ्रष्ट महायुती सरकार स्थापन केली. अशा लुटारूंचा सहभाग असलेल्या महायुती सरकारने आपल्या मानगुटीवर बसून संपुर्ण राज्याचे वाटोळे केले असुन या महापापिंना सत्तेतून पायउतार करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही तालुक्यांतील पळसगाव (जाट) येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना बोलले.

आयोजित सभेस सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, काँग्रेस अनुसूचित जाती सेल तालुका अध्यक्ष नरेंद्र भैसारे, रीपाई (गवई गट) नेते गोपाल रायपूरे, पळसगाव सरपंच जगदीश कामडी, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक संगत,निरंजन पाकमोडे, सिंदेवाही माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजित मुप्पिडवार, निक्कु भैसारे, सचिन सहारे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही केवळ राज्याची निवडणूक नसून दोन विचारांची लढाई आहे. या लढाईत एकीकडे संविधान परिवार तर दुसरीकडे मनुस्मृती जपणारा संघ परिवार आहे. या संघ परिवाराने सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम करण्या हेतू संविधान बदलविण्यासाठी षडयंत्र रचले असून देशातील सर्वसामान्य जनतेचा हक्क साबूत ठेवणारा महान ग्रंथ संविधानाला वाचवण्याची जबाबदारी आता तुमची आणि आमची आहे. असेही ते म्हणाले.तर भाजपवाल्यांनी या क्षेत्राचा कुठलाही विकास केला नाही आणि आता उलट्या बोंबा मारत असून खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवीत असल्याची तसेच लाडक्या बहिणींना धमकविण्याचेही काम भाजपकडून सुरू असल्याची टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केली. कोरोना काळात कुटुंब प्रमुख या नात्याने जबाबदारी खांद्यावर घेऊन परराज्यात अडकलेल्या लोकांना सुखरूप पोहोचविले. गोसेखुर्द धरणातून पाणी पोहोचवून शेतकऱ्यांची अडचण दूर केली. कॅन्सल कृष्ण रुग्णांना आधार देऊन त्यांचे प्राण वाचविले तर मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटपातून 50 हजार नागरिकांना दृष्टी दिली. मी नेहमी मानव सेवेचा धर्म पाळून जनतेच्या पाठीशी सदैव उभा आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा जनतेपुढे वाचला. आयोजित सभेपूर्वी प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या शिवराय ते भिमराय आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेश्राम यांनी केले. आयोजित कार्यक्रमास बहुसंख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here