चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य कौटुंबिक मेळावा संपन्न..

0
248

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर:- येथील चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काल दिनांक १०/११/२०२४ रोज रविवारला सांय. 6 वा. एकलव्य सभागृह चंद्रपूर येथे कौटुंबिक मेळावा घेण्यात आला. सदर कंत्राटी कामगारांच्या कौटुंबिक मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर विधानसभाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. किशोर जोरगेवार हयांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच कौटुंबिक मेळावाचे आयोजनास कंत्राटी कामगार नेते मा. बंडू हजारे यांनी अथक परिश्रम घेतले.

७१- चंद्रपूर विधानसभाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. किशोर जोरगेवारांनी संबोधन करताना म्हटले की, मी सदैव कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती सोबत असून ज्या ज्या वेळेस कंत्राटी कामगार शोषण होत असते आणि समस्त कंत्राटी कामगार वर्ग आपल्या मागण्याला घेऊन संप आंदोलन करत असते त्यावेळेस मी देखील पाठपुरावा असतो. शासकीय, प्रशासकीय, स्तरावरील बैठकीमध्ये मी जिल्ह्याचा म्हणजेच चंद्रपूर विधानसभेचा आमदार म्हणून कंत्राटी कामगारांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, त्यासाठी प्रत्येक बैठकीमध्ये पाचरन केले आहे आणि समोर पण कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी आम्ही सर्व लढा देत राहू . कंत्राटी कामगार बांधव वीज निर्मितीचा एक अविभाज्य भाग असल्याने राज्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यास आम्ही कंत्राटी कामगार बांधवांना घरकुल योजना लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळवून देऊ यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती मा.किशोर भाऊ जोरगेवार यांनी कौटुंबिक मेळाव्याला संबोधन करताना आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सर्व कंत्राटी कामगार बांधव आणि भगिनींनी दिनांक २०/११/२०२४ ला मला भरघोस अश्या मताधिक्याने विजयी करून आपले सहकार्य, प्रेम देण्याची विनंती ही करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजक मा. बंडू हजारे यांनी कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्याबद्दल सविस्तर माहिती देत खालील प्रमुख विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी कामगारांनी आपले संपूर्ण नाव आणि दूरध्वनी क्रमांक घरकुल योजना करिता नोंदणी करून घेण्याची विनंती केली.
१) मुळ वेतनामध्ये झालेल्या १९% वाढ एरियस संदर्भात सविस्तर मार्गदर्शन,२) विज निर्मिती कंत्राटी कामगारांना घरकुल करिता नोंदणी ३) कामगारांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष भाई सदानंद देवगडे, कार्याध्यक्ष हेरमन जोसेफ, सचिव संतोष भाऊ निकुरे, उपाध्यक्ष प्रमोद कोलारकर, सहसचिव संतोष ढोक, प्रसिद्धीप्रमुख रवि पवार , सल्लागार संतोष पारखी, विकास अडबाले, वकीलभाऊ मेश्राम, गजानन जवादे, आदी कृती समिती मधील सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि असंख्य मोठ्या संख्येत कामगार बांधव आणि भगिनी याची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here