prabodhini news logo
Home गडचिरोली आरमोरी विधानसभा क्षेत्रात १५ ला आप ची एंट्री

आरमोरी विधानसभा क्षेत्रात १५ ला आप ची एंट्री

0
224

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : आरमोरी विधानसभेत आपले संघटन मजबूत करण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली असून, येथे आप पक्ष संघटन झपाट्याने वाढवत आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने काँग्रेसचा प्रचार केला होता, त्यामुळे काँग्रेसला भरपूर फायदा झाला होता, विशेषत: आप पक्षाने देसाईगंजमध्ये बूथ उभारून भाजपची बरीच मते बदलली होती, मात्र विधानसभेत आरमोरी विधानसभेत आम आदमी पार्टी कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याबाबत आप पक्षाची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत आहे. आप पार्टी चे कार्यकर्ते आणि मतदार हे मूक (saylent) मतदार असल्याने आरमोरी विधानसभेत मोठा बदल घडू शकतो, हे नाकारता येणार नाही. तसेच गडचिरोलीतही विरोधी पक्षातून उभे असलेले आम आदमी पक्षाचे बारकृष्ण सवसागडे यांना आपचे कार्यकर्ते पाठिंबा देत असून, आरमोरी विधानसभेत आप पार्टी १५ नोवेम्बर ला पत्ते खोलणार आहे असे आप चे देसाईगंज चे पदाधिकारी यांनि सांगितले ,आप च्या निर्णयाने आरमोरी विधान सभा शेत्रात मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here