prabodhini news logo
Home ठळक बातम्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कमलिनी कर्णबधिर विद्यालय येथे दिली भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कमलिनी कर्णबधिर विद्यालय येथे दिली भेट

0
85

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोईसुविधाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज, दि. 04 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडे दहा वाजता कमलिनी कर्णबधिर विद्यालय, ठाणे (पू) येथे भेट दिली.
         यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, कमलिनी कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक माया कुलकर्णी, शिक्षक तसेच मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
        या भेटी दरम्यान शाळेतील वातावरण कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कमलिनी कर्णबधिर विद्यालयातील शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली आहे असे कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. 
        शाळा भेटीतून शालेय कामकाज, वर्गातील अध्यापन, विद्यार्थी अध्ययन स्तर, शाळेतील वर्ग व्यवस्थापन, सीएसआर सहकार्यातून मिळालेली शैक्षणिक साहित्य, शिक्षकांच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याद्वारे कर्णबधिर मुलांच्या अध्ययन क्षमतेत होणारी वाढ याविषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
        शाळेतील ‘वाचा व श्रवण कक्ष’ पाहणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाचन तसेच प्रगती साधण्यासाठी आवश्यक बाबीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले, तसेच भावी काळात कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात वाढ करण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिले जाईल व विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही आश्वासन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here