
नवरगाव उपवनक्षेत्र कार्यालयासमोरील घटना
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगळे महत्व आहे.आणि या महत्वपूर्ण गोष्टीमधील साप हा सुद्धा महत्वाचा घटक आहे.
साप हा प्रकार मानवाच्या मनात इतक्या खोलवर भिती निर्माण करून बसला आहे की,एखाद्या व्यक्तीला समजवणे फार कठीण होते.अशामुळे एखाद्या व्यक्तीला विषारी सर्पदंश झाला आणि .औषधोपचार उपलब्ध नसल्याने काही वेळात ती व्यक्ती मृत्यूमुखी पडू शकते.
माणूस व सापामधील संघर्ष सनातन असला तरी दुस-या बाजूस सापांची मुक्तता करून त्यांना सुरक्षित स्थळी नेऊन सोडणारे असंख्य सर्पमित्र संपूर्ण देशभरात आहेत.

अशातच एक घटना दि.८ डिसबंर २०२४ ला घडली नवरगाव उपवनक्षेत्र कार्यालयासमोर नालीमधे नाग साप निघाला आणि या.. सापाला बघायला खुप गर्दी झाली.. आजु बाजुचे लोक घाबरून गेले आणि या सापाला पकड़नार कोन ?तेव्हा नवरगाव उपवनक्षेत्राचे क्षेत्रसाहाय्यक व वनरक्षक नितेश शहारे यांना माहिती होताच त्यांनी सापाला धरून निसर्गमुक्त करण्यासाठी उपयोजना आखली व वनरक्षक नितेश शहारे यांच्या पत्नी सौ.रुपाली शहारे यांनी काही वेळातच त्या सापाला इजा न होता पकडले व डब्बा बंद केले. यावेळी गावातील लोकांना सापाविषयी थोडक्यात माहिती दिली व भयमुक्त केले.
समयसुचकतेमुळे या सापाला तर जीवदान मिळालेच परंतु
उपवनक्षेत्र कार्यालयात नोंद करून त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी यांनी या सापाला जंगलात सुखरूप सोडले.














