सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा सिरोंचा येथील परिवर्तन भवन येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चारीटेबल ट्रस्ट सिरोंचाच्या वतीने संस्कृती परिवर्तन दिनाचा निमित्ताने फुले शाहू आंबेडकर महासम्मेलन 24 व 25 डिसेंबर ला आयोजित करण्यात आला होता .
दिनांक 25 डिसेंबर ला रात्रौ कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होता. तर या कव्वाली कार्यक्रमाचे उदघाटन आविसं,काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित उदघाटनीय कार्यक्रमाला सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.यावेळी मंडळाकडून अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांच स्वागत तसेच सत्कार करण्यात आली.
यावेळी मंचावर येथील आविसं व काँग्रेसचे जेष्ठनेते मंदा शंकर,कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन आकुला,आविसं व काँग्रेसनेते बानय्या जनगाम,माजी महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम,गर्कापेठा ग्रामपंचायतचे सरपंच सुरज गावडे,भाजप तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम,मारुती गणपूरवार, अजय सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,गणेश राच्चावार,लक्ष्मण बोल्ले,दुर्गे लांबडी,प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवार सह आदी उपस्थित होते.

