prabodhini news logo
Home अहेरी अल्लापल्ली येथे जन आक्रोश मोर्चा आयोजन मा अजय कांकडालवर यांची उपस्थिती.

अल्लापल्ली येथे जन आक्रोश मोर्चा आयोजन मा अजय कांकडालवर यांची उपस्थिती.

0
189

विवेक बा मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी – अहेरी : आलापल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके चौकात लोकशाही पद्धतीने आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जनआक्रोश मोर्चाला आदिवासी विध्यार्थी संघ, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी सहभागी होत आपला सक्रिय पाठिंबा दर्शवीला. तसेच मोर्चात उपस्थित जन समुदायला मार्गदर्शनही केले.

परभणी येथील संविधान प्रकृतीची विटंबना, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीसांच्या मारहाणीत झालेला मूत्यू आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेतील अपमान जनक व्यक्तत्व यांच्या विरोधात बाबुराव शेडमाके चौकात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आली.

मोर्चाचे मंडप ठिकाणी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून उपस्थित मोर्चेकरूंसाठी अन्नदान कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. मोर्चात स्थानिक महिला, पुरुष तसेच परिसरातील भीम भक्त मोठ्या संख्येने सहभाग झाले होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here