
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर -लाठी काठी गोवा येथील स्पर्धेत दोन सुवर्ण पदक व धुळे येथील राष्ट्रीय स्पर्धेत मेघा मुधोळकर हिने तीन सुवर्णपदक पटकाविले. त्यानिमित्ताने त्यांचा भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार समारंभ साजरा करण्यात आला.योगिता धनेवार,अभिलाषा मैंदळकर,प्रीती लखदिवे,रेखा जोगी,मनीषा भाके , वर्षा इटनकर,आशा मुधोळकर,सुनीता ढगे उपस्थित होते. भावसार समाजाची पहिली महिला असून तिने लाठी काठी स्पर्धेत एकूण पाच सुवर्णपदक प्राप्त केले. याकरिता तिने खूप परिश्रम घेतले. ती अत्यंत शांत सुस्वभावी व संयमी आहे. सत्कारमूर्ती मेघा मुधोळकर यांचे कौतुक करताना सौ अभिलाषा मैंदळकर म्हणाल्या, महिला सशक्त व सुदृढ असणे म्हणजे आनंददायी जीवन जगण्याचा मंत्र आहे. महिलांनी आपले आरोग्य उत्कृष्ट राखणे गरजेचे आहे त्यांनी दुसऱ्यावर आश्रित राहू नये. महिलांनी कुठल्याही खेळात सहभाग घेऊन आपले शरीर सुदृढ व निरोगी करून आपला शारीरिक व मानसिक विकास करायला हवा. मेघा मुधोळकर यांनी जिद्द व चिकाटीने परिश्रम करून आपला व समाजाचा माण उंचावला आहे खऱ्या अर्थाने ती समाजभूषण ठरली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय त्यांचे प्रशिक्षक शैलेश बावनकर व आई वडील व पती यांना दिले आहे.














