
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत रत्नापूर चे ग्रामविकास अधिकारी नरेंद्र वाघमारे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामपंचायत रत्नापूर येथील सरपंच ,उपसरपंच तथा सदस्य यांचे वतीने शाल ,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
रत्नापूर ग्रामपंचायत ही १५ सदस्यीय आहे आणि रत्नापूर गाव राजकारणी म्हणून जिल्हात ओळख आहे या गावात ग्रामविकास अधिकारी यांनी सताधारी विरोधक याना जुळवून त्यांचा समन्वय साधुन घेत व त्यांना विश्वासात घेवून गाव विकासाचे कार्य उत्तम रीत्या पार पाडलेसोबतच गावकरी जनतेला सुद्धा वेळोवेळी चांगल्या शासकीय योजनाबदल मार्गदर्शन व समस्याचे निवारण करुण सदैव गाव विकासाचे व गावकरी जनतेचे हीत जोपासून सतत दोन वर्ष रत्नापूर गावाला ग्रामविकास अधिकारी म्हणून उत्तम रीत्या सेवा दीली त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून रत्नापूर ग्राम पंचायात च्या वतीने ग्रामपंचायत सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांचा शाल श्रीफळ व ड्रेस देऊन सत्कार करण्यात केला.
यावेळी सरपंच नजरी मेश्राम, उपसरपंच अशोक गभणे ,सदस्य मंगेश मेश्राम ,वासुदेव दडमल, प्रवीणकुमार कामडी ,अरुण मडावी, इमरान पठान,सुरेखा पर्वते ,उषा धारणे, वामन झोडे ,हेमलता सोनटक्के ,कविता सावसाकडे, रजनी काऊलकर, माया लोधे ,सुनंदा मांदाळे यांचे सह कर्मचारी प्रमोद भरडे, संजय बोरकर ,रामकृष्ण गरमळे, संतोष धुर्वे ,प्रणय शेंडे, सुनिल पालकर ,राहुल कोवे सोबत गावातील महिला पुरुष बहुसंख्येनी उपस्थीत होते.














