prabodhini news logo
Home चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे सोनोग्राफी मशीनची तातडीची मागणी – आप

ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे सोनोग्राफी मशीनची तातडीची मागणी – आप

0
184

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भद्रावती तालुका हा झपाट्याने विकसित होत असलेला तालुका असून येथे मोठ्या लोकसंख्येची सेवा करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्यामुळे येथील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सोनोग्राफी मशीनची आवश्यकता:
विशेषतः प्रसूतीसंबंधी (डिलिव्हरी) प्रकरणांमध्ये गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी चंद्रपूर किंवा खाजगी केंद्रांवर जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि मेहनत यांचा अपव्यय होतोच, परंतु रुग्णांना मानसिक आणि शारीरिक त्रास देखील सहन करावा लागतो. याशिवाय, इतर आरोग्य समस्या असलेल्या रुग्णांनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

भद्रावती तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येच्या आणि आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीनची तातडीने व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.

आम आदमी पार्टीची मागणी
आज या मागणीसाठी आम आदमी पार्टी भद्रावती च्या नेतृत्वाखाली सिव्हिल सर्जन यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे भद्रावती ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली.

या वेळी उपस्थित कार्यकर्ते शहराध्यक्ष अनिल कुमार, युवा अध्यक्ष रोहन गजेवार, रितेश नगराडे, डोरा स्वामी, राजकुमार चट,विनीत निमसितकर, पिंटू भद्रुजे, प्रदीप लोखंडे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा:
भद्रावती ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत व परवडणाऱ्या दरात योग्य वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने तातडीने सोनोग्राफी मशीनची व्यवस्था करावी, अशी आम आदमी पार्टीची जोरदार मागणी आहे. हा निर्णय स्थानिक नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरेल व आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here