prabodhini news logo
Home ठळक बातम्या वरखेडा विद्यालयात कृतज्ञता सोहळा…

वरखेडा विद्यालयात कृतज्ञता सोहळा…

0
161

आंबेवणी वरखेडा येथील वडजे कुटुंबाचा वारसा तालुक्याला मार्गदर्शक-प्रवीण नाना जाधव

जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 9175794502 -“मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदीर वरखेडा विद्यालयात आंबेवणी गावचे आदर्श निवृत्त शिक्षक दत्तात्रय वडजे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर मंगेश दादा वडजे यांच्या वडजे कुटुंबाने जनता विद्यालय वरखेडा विद्यालयास चार (4) लाख रुपयांची देणगी प्रदान केली. तसेच जनता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दिंडोरी महाविद्यालयास एक (1) लाख रुपयाची देणगी प्रदान केली.
दत्तात्रय वडजे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर मंगेश दादा वडजे यांच्या वडजे कुटुंबाचा आदर्श वारसा संपूर्ण दिंडोरी तालुका नाशिक जिल्ह्याला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे दिंडोरी पेठ तालुक्याचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
आंबेवणी गावचे दानशूर व्यक्तिमत्व दत्तात्रय वडजे यांचे सुपुत्र मंगेश वडजे हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते हायबार टेक्नो कंपनीचे सीईओ (CEO) असून त्यांनी जनता विद्यालय वरखेडा विद्यालयास शालेय विकासासाठी 4 (चार) लाख रुपयांची देणगी दिली.ही देणगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन भामरे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन भामरे सर यांनी करून वडजे कुटुंबाचे आभार मानले.उपशिक्षक संजय जाधव यांनी वडजे कुटुंबाचा परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे असलेले रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक दत्तात्रय वडजे यांनी आंबेवणी वरखेडा गाव परिसराशी असलेले ऋणानुबंधाची नाते आपल्या मनोगतातून व्यक्त केले.आज पर्यंत या विद्यालयास 26 लाख रुपये देणगी रुपात वडजे कुटूंबाने दिले आहे.
फायबर टेक्नो या कंपनीची सीईओ मंगेश दादा वडजे यांनी आपल्या गावाची नाळ तुटू देता कामा नये व आपल्या कुटुंबाचा आदर्श शैक्षणिक वारसा पुढे चालवून गोरगरीब विद्यार्थ्यांप्रती शाळेविषयी,संस्थे विषयी ऋण व्यक्त केले.
वरखेडा गावचे उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनी आंबेवणी येथील वडजे कुटुंबाचे कौतुक करून अशा प्रकारचे दान करायला फार मोठं मन लागतं ते वडजे कुटुंबाजवळ आहे असे सांगितले.
वरखेडा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माणिकराव उफाडे यांनी वडजे कुटुंबाचा गावाच्या वतीने यथोचित सत्कार करणार असल्याचे आपल्या मनोतातून सांगितले.
या कार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे दिंडोरी तालुक्याचे संचालक प्रवीण नाना जाधव, शोभा दत्तात्रय वडजे शैला वडजे,चंद्रकला वडजे शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ,कादवा कारखान्याचे संचालक बापूराव पडोळ वरखेडा गावचे उपसरपंच राजेंद्र आबा उफाडे,किसन अण्णा भुसाळ,नंदू भाऊ काळोगे सुभाष वडजे संजय डोखळे,गोविंदराव गडकरी,मराठा हायस्कूल नाशिकचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात मखमलाबाद विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील पाटील सर मुख्याध्यापक नितीन भामरे सर,वरिष्ठ लिपिक कैलास उगले,विजय देशमुख दिनकर वडजे सिताराम सवंद्रे विश्वासराव पडोळ,दत्तात्रय उफाडे,विजय देशमुख राजेंद्र उफाडे रघुनाथ जाधव,दिंडोरी विद्यालयाचे मुख्याध्यापक शेजवळ सर वरखेडा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माणिकराव उफाडे संजय उफाडे,मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष संतोष कथार सर,अशोक वडजे,अरुण वडजे प्रवीण वडजे वसंत वडजे,सचदेव उफाडे रामनाथ सवंद्रे विश्वास पडोळ,सोपान सोनवणे,जगदीश वडजे आदी सभासदांबरोबरच वरखेडा परिसरातील अनेक पालक वर्ग, प्रगतीशील शेतकरी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय जाधव व गायत्री पवार यांनी संयुक्तपणे केले तर आभार उपशिक्षिका वृषाली रौंदळ यांनी मानले.देणगी प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here