प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – जागतिक महिला दिन निमित्ताने कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन व कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक 9 मार्च 2025, ठिक सकाळी 11.00 वाजता प.सा. नाट्यमंदिर, नेहरू गार्डन शेजारी, शालिमार, नाशिक येथे प्रमुख पाहुणे अभिनेत्री प्रांजली बिरारी नेवसकर, अँड सुवर्णा शेवाळ, अध्यक्ष सुनिल मोंढे यांच्या उपस्थितीत सन्मान महिलांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यात वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डॉ. पुष्पलता इंगळे, नाशिक, कृषी क्षेत्रातील पुरस्कार ताराबाई भाऊसाहेब येळवंडे, अहिल्यानगर, सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार चारुलता राज पावसेकर, यवतमाळ, सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार प्रिया प्रमोद दामले, पुणे, सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार नाट्य कलावंत अंजली विठ्ठल गादे, लातूर, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आशा वसंत शिंदे, मुंबई, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार डॉ. संजीवनी दादाजी जगताप, नाशिक, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार विजय पोपट जाधव, नाशिक, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार मंजुषा टेमझरे, अकोला, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार वैजयंती श्रीकृष्ण सिन्नकर, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सविता धनंजय चतुर, नाशिक, सन्मानार्थि साहित्यिक क्षेत्रातील सन्मान दिपाली सोसे, अकोला, कवी क्षेत्रातील सन्मान कवयित्री शैलजा करोडे, मुंबई, नृत्य क्षेत्रातील सन्मान शिल्पा शाहीर, नागपूर, अभिनय क्षेत्रातील सन्मान कल्पना वाढे, पुणे, सामाजिक क्षेत्रातील सन्मान सुनीता भालेकर, मुंबई, सामाजिक क्षेत्रातील सन्मान अँड. सोनाली सूर्यवंशी – सोनवणे, नाशिक, सामाजिक क्षेत्रातील सन्मान सौ. सुप्रिया रमेश गवळे, नाशिक, अभिनय क्षेत्रातील सन्मान बेबीजान पठाण, पुणे, साहित्यिक क्षेत्रातील सन्मान चैताली वरघट, अकोला, सामाजिक क्षेत्रातील सन्मान क्षितिजा खटावकर, नाशिक यांना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुनिल मोंढे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सूत्रसंचालन वैजयंती सिन्नरकर, यांनी केले. आभार लावणी सम्राट शिल्पा शाहीर यांनी मानले.

