
माजी आमदार डॉ. देवरावजी होळी
समता बहुउद्देशीय कल्याणकारी विकास संस्था महिला मेळाव्याचे आयोजन
चामोर्शी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 11 मार्च चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे समता बहुउद्देशीय कल्याणकारी विकास संस्था च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सरपंच बेबी बुरांडे, डॉ. चंदा कोडवते, डॉ. सोनल कोवे, सरपंच नंदा कुळसंगे, सीमा खोबे, अर्चना निमसरकार, रोशनी वरघंटे, कविता किरमे तसेच मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.















