जागतिक वन दिनानिमित्य सुजाता कन्या विद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न

0
302

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा- सामाजिक वनीकरण परीक्षेत्र पवनी च्या विद्यमाने सामाजिक वन दिनानिमित्य दि. 21 मार्च 2025 रोज शुक्रवारला अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आली.निबंध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.

ह्याप्रसंगी सामाजिक वनीकरण परीक्षेत्र पवनीचे वनपाल आर.जी. मेश्राम यांनी विद्यार्थिनींना वनाचे महत्व,वन्यजीव व पर्यावरण ह्याविषयी सविस्तर माहिती दिली.
ह्यावेळी सुजाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.भारती गिरडकर,वनपाल आर.जी.मेश्राम,वनरक्षक एम.एम.भजे,डी. बी.इटवले,कु.बी.एच.गजापुरे त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here