नाशिक जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांचा शिवस्वराज्य युवा फाउंडेशन व नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य कडून यथोच्च गौरव

0
87

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नाशिक आज दि.3 एप्रिल रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात बालरुग्ण विभागात अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे एस.एन सी.यू.बालरुग्ण विभागात अचानक लागलेल्या आगीमुळे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकांनी व सर्व टीमने अतिशय जिकरीने ६९ बालकांना या घटनेतून सुखरूप वाचवले व दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले .यात प्रामुख्याने तेथे उपस्थित असलेल्या त्या विभागाच्या सर्व परिचारिकांनी वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली आणि चाणाक्ष पने सर्व नातेवाईकांना सावरत सर्व परिचारिकांनी सर्व घटनेला सर्व प्रकाराने सांभाळत सर्व लहान लहान बालकांना कुठल्याही प्रकारची जीवित हानी न होऊ देता सुखरूप बाहेर काढले.त्यात सर्व नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे महाराष्ट्रभर कौतुक करण्यात येत आहे.
या घटने मध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे करावे तितके कौतुक कमीच आहे कारण राज्यभरात परिचारिका म्हटले म्हणजे त्या सर्व कुटुंब सांभाळून नोकरी करत असतात.आणि अशातूनच सर्व समाजाला चांगल्या प्रतीची रुग्णसेवा देऊन रुग्णांना वेदना राहत करण्यासाठी राज्याच्या परिचारिका नेहमीच अग्रेसर असतात.कालच्या घटने मागे याच सर्व परिचारिकांनी जीवाच्या आकांताने जिकिरीचे प्रयत्न केलेत व सर्व बालकांना यातून कुठलीही इजा होऊ दिली नाही.यात हे करत असताना सर्व बालकांच्या पालकांना सांभाळणे देखील तितकेच जिकिरीचे काम होते ते करत असताना बालकांना देखील सुखरूप ठिकाणी हलवणे हे आपण ऐकतो तितके साधे आणि सोपे देखील नव्हते त्यामुळे या सर्व टीमच्या कौतुकास्पद कामगिरी मुळे राज्यभरात तरुणांसाठी सर्व घटकांमध्ये सामाजिक, संस्कृतिक, शैक्षणिक, व आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र भर उत्कृष काम करणारी संस्था शिवस्वराज्य युवा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन चे संस्थापक उपाध्यक्ष शिवश्री अजय केशरबाई भास्कर मराठे.यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने नाशिक जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांचा यथोच्च गौरव करून व त्यांचे मनोबल वाढवले.
यावेळी नाशिक जिल्हा रुग्णालय अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मा.निलेश पाटील सर,अधिसेविका मा.अनिता भालेराव मॅडम, सहाय्यक अधिसेविका मा.शुभांगी वाघ मॅडम,नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन च्या अध्यक्षा पूजा पवार मॅडम,बालरोग तज्ञ परिचारिका छाया शिंदे, एस. एन. सी. यू. इन्चार्ज श्रद्धा पाटील , सीमा गवई, एस. एन सी. यू. स्टाफ भारती शिंदे, बालरुग्ण इन्चार्ज ज्योती वाघ, मनोरुग्ण परिचारिका तृप्ती काळे, नर्सिंग ऑफिसर्स प्रवीण दिघे, हेमंत पवार, अयाज शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here