गरीब व गरजू महिलांना साड्या, लुगडे वाटप
सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा उपक्रम
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी, भंडारा
मो.9665175674
भंडारा – महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्या बरोबर आर्थिक, सामाजिक कौटुंबिक, जीवन जगण्यासाठी विशेष महत्त्व दिले जात आहे. त्यावर अधिक भर द्यावे. त्याकरिता आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांनी स्वाभिमानी जिवन जगावे असे प्रतिपादन सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या असिस्टंट चॅरिटी कमिशनर (अधिक्षक) निलमा मालोदे यांनी केले.त्या महाराष्ट्र शासनाचे शंभर दिवसाचा आराखडा कार्यक्रमांतर्गत गरीब व गरजू महिलांना साड्या व वायल ( लुगडे) वाटप कार्यक्रम सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली शितला माता देवस्थान, तुळजाभवानी देवस्थान, अंबाई- निंबाई देवस्थान व अन्नपूर्णा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या असिस्टंट चॅरिटी कमिशनर (अधिक्षक) निलमा मालोदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या सुप्रीटेंट छाया भुसारी, निरीक्षक कीर्ती दुरुगकर, शितला माता मंदिराचे अध्यक्ष ईश्वरलाल काबरा, कोषाध्यक्ष धनराज धुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या मंगला कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, किशोर वाघमारे तसेच चारही देवस्थानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना मार्मिक उदाहरण देऊन नवरात्र उत्सवात मॉ दुर्गा देवी व देवीच्या विविध रूपा बद्दल तसेच महिलांची भूमिका हीसुद्धा दुर्गा प्रमाणेच असते असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच महिलांनी दुर्गा देवीच्या भक्तीचे आराध्यना कशी करावी याचे महिलांना मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भक्तिमय वातावरणात
सूर मधून गायन करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील गोर गरीब व निराधार गरजू महिलांना साड्या व लुगडे (पातळ) व ताक वाटप कार्यक्रमात ५०० च्या वर महिलांनी लाभ घेतला. चैत्र नवरात्र असल्याने महिलांना मातेचा प्रसाद मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसळतांनी दिसत होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना शेळके व प्रास्ताविक सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या सुप्रीटेंट छाया भुसारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता सारिका मोरे, भावना ढगे, शितल कोल्हे, वंदना घाडगे, अमृता शहरातील शितला माता मंदिर देवस्थान, तुळजाभवानी देवस्थान, अंबाई- निंबाई देवस्थान व अन्नपूर्णा देवस्थान मंदिर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

