प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्रात नगण्य अश्या शैक्षणिक संस्था आहेत की, त्या संरक्षण क्षेत्रात आपले नाव विविध दलात प्रगल्भ करीत आहेत.त्यातील ही एक म्हणजे 1998पासून संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली SJVM छत्रपती संभाजीनगर (औ.बाद)संचलित SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर (औ.बाद)येथे असून महाराष्ट्रातील युवक – युवतींना सैन्यदलात अधिकारी जसे-आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण देणारी भारतातील एकमेव शासकीय सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था SPI छत्रपती संभाजीनगर / GSPI मुलीं करिता नाशिक येथील परीक्षेत SSC डिफेन्स अकॅडमी चे 8 विध्यार्थी पास झालेले असून मुलाखतीस पात्र झालेले आहेत.
या निवडीबद्दल SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर चे संचालक प्रा.अंकुश शेळके यांनी विध्यार्थ्याचे कौतुक करून मुलाखतीसाठी मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे मार्गदर्शक सुभाष देवकर यांनी ही विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.जगन गोडसे, डॉ. अमोल साबळे, प्रा.मालकर, आंग्लभाषेचे विभाग प्रमुख एस.बी.पाटील, गणित विभागाचे प्रमुख राजविर पाटील, प्रा.सुभाष उफळकर, प्रा.बी टी.जाधव सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.विष्णू गायकवाड, प्रा.कुलकर्णी, प्रा.शुभम महाजन, प्रा.शुभम घोडके, निरीक्षक प्रा.रत्नाकर केंद्रे तसेच दुर्गा पाटील, सुशिला शिराळे यांचे ही विध्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले असून सर्व शिक्षकांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात…!!!

