prabodhini news logo
Home गडचिरोली नाट्यश्री तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन.

नाट्यश्री तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन.

0
119

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गडचिरोली : स्थानिक नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली च्या वतीने निरनिराळे साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून १८ मे रोजी स. ११ वाजता ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गडचिरोली येथील सभागृहात राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी संमेलनात भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच विषयाचे बंधन नाही. तथापि ही कविता एखाद्या समाजावर, धर्मावर, व्यक्तीवर, राजकीय परिस्थितीवर टिका करणारी किंवा कोणाची मानहानी करणारी, अराजकता माजविणारी नसावी.
नवोदित व प्रस्थापित कवींना मंच उपलब्ध करून देणे हा नाट्यश्री चा उद्देश आहे. तरी जास्तीत जास्त कवींनी भाग घेण्याचे आवाहन कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे, अरुण बुरे व नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी केलेले आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या कवींनी १५ तारखेच्या चुडाराम बल्हारपुरे, भ्रमणध्वनी क्र. ९६२३६६३४३५ वर संपर्क साधावा.
– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here