प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर सिटी हायस्कूल येथे तब्बल तीस वर्षानंतर 1994 -95 विद्यार्थी आणि शिक्षक स्नेहसंमेलनानिमित्त एकत्र आले. सर्व विद्यार्थ्यांना शाळा सोडून 30वर्षे पूर्ण झाली असतानाही या प्रदीर्घकालावधीनंतर त्यांनी एकमेकांचा कसाोशीन शोध घेऊन या ४0 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्नेहसंमेलनाच आनंद मनमुराद घेतला, असे यातील माजी विद्यार्थी तरुण खांडे यांनी सांगितले.
कोणी पुणे कोणी मुंबई अशा अनेक विविध शहरातून फक्त आपल्या शाळेच्या हव्या हव्याशा वातावरणात आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी आले.
शाळेच्या जुन्या आवारात, जुन्या शिक्षकांसोबत जुन्या आठवणी ताजा करत वेगवेगळ्या शहरात कामानिमित्त वास्तव्यास असणारे सगळ्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमिलनास सिटी हायस्कूल चंद्रपूरचे विद्यमान शिक्षक गण, सतीश राखुंडे, प्रदीप राखुंडे, सादरे, धोपटे, घोटेकर, राजुरकर, निखारे, खणके मॅडम, पराते, थोरात, प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी झालेलं बघून सर्व शिक्षक वर्गाला खूप आनंद झाला.
शाळेचे माजी विद्यार्थी भरत बोबाटे, दीपक राजनहिरे, कपिल गौरकार, कमलेश देवगन, कपिल गोवर्धन, मनीष मावळणकर, राहुल नामपल्लीवार, तरुण खांडे, मोहन निखारे, पंकज कावडे, प्रकाश बल्लेवार ,प्रवीण चव्हाण, संजय नाट, राजकुमार सोनारकर, संजय सिंगाडे, सुदर्शन पाटील, सुरज दुर्गे, प्रशांत पराये, तथागत अलोने, राम माणिक, सुजित खोब्रागडे, अमर निनावे, सचिन रामगुंडेवार, हर्षा कारिया, मुग्धा पुल्लावार, मनोज साखरकर, संतोष बारसागडे, दिपाली राखुंडे, राकेश सेगमवार, ललित ठाकरे सगळ्यांनी आपल्या जुन्या आठवणीत एक उनाड दिवस साजरा केला.

