लाडक्या माई,आमदार सईताई डहाके,जनता दरबारात कारंजेकराचे प्रश्न मार्गी लावणार

0
13

नागरिकांनी आपल्या समस्या व जनहिताचे कामे त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे आवाहन

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी कारंजा : कारंजेकरांच्या लाडक्या माई,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या आणि विशेष म्हणजे स्थानिक आमदार श्रीमती सईताई डहाके ह्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यामुळे राजकारणात नविन असल्या तरी,स्थानिक मतदार संघाच्या विकासाकरीता विकास योध्दे माजी आमदार स्व.प्रकाशदादा डहाके यांनी मतदार संघाच्या व स्थानिक जनतेच्या विकासाकरीता केलेले राजकारण जवळून पाहिले आहे. शिवाय माई आमदार सईताई ह्या मनमिळाऊ,मायाळू,बोलक्या, हास्यमुख असल्यामुळे आणि सदैव सर्वसामान्य ग्रामस्थामध्ये राहणाऱ्या असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य,गोरगरीब जनतेचे, वयोवृद्ध,दिव्यांग आणि लाडक्या बहिणीचे प्रश्न कोणते ? त्यांच्या अडचणी कोणत्या ? समस्या कोणत्या ? याची पुरेपूर माहिती आहे.गोरगरीब नागरिकांच्या मागण्या सर्वसाधारणतः किरकोळ असतात.किंवा सामाजिक व सार्वजनिक हिताच्या असतात.त्यामुळे आपल्या मतदारांनी स्वतः जातीने त्या आपल्या पर्यंत पोहोचवाव्यात. विशेषतः मतदार संघातील जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा.असे त्यांना वाटत असते.तसेच मतदार संघाच्या समस्यांची त्यांना चांगलीच जाण आहे.त्यामुळे ह्या समस्या, मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या मार्फत आपल्या सरकार कडून व पक्षश्रेष्ठींकडून सोडविण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या या महत्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज समाधान बैठकीद्वारे जनता दरबाराचे आयोजन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत, दि. २१ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता स्थळ : शेतकरी निवास, मंगरूळपिर रोड, बायपास कारंजा येथे करण्यात आले आहे. विशेष करून जनतेच्या समस्या शक्य तेवढ्या लवकर सोडविण्याकरीता यावेळी स्थानिकचे सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, बँकेचे व्यवस्थापक, विद्युत विभागाचे अभियंता वगैरे यावेळी उपस्थित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वी सोमवार, मंगळवार पर्यंत कारंजेकर माता भगीनी व नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडी बाजार कारंजा येथील जनसंपर्क कार्यालय किंवा तहसिल कार्यालयात लेखी स्वरूपात अर्जाद्वारे सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी मिळाली असल्याचे कळवीले आहे. आमदार सईताई डहाके यांच्या ह्या जनता दरबाराने जनतेच्या अनेक तक्रारी निकाली किंवा मार्गी लागण्यास मदत होणार आहे.आमदार सईताई डहाके यांच्या सेवाभावी स्वभावामुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ लवकरच विकासात अग्रेसर होणार असल्याचा आशावादही या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here