prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन

0
133

पर्यावरण दिन करू साजरे आनंदाने
वाढवू प्रतिष्ठा आपली नव्या रोपट्याने
लावू सुंदर रोप त्याचे करून संगोपन
देऊ पाणी त्यास खत संवर्धन

तोडलेत जंगल कुऱ्हाडीच्या घावाने
झाडाने रक्त ओसंबिले ना इलाजाने
जंगलाची कटाई करी मानव प्रामुख्याने
सुख सोयीसाठी तोडतो बेभानाने

विसरू नये तो कोरोनाचा काळ
ऑक्सीजन नव्हते मिळतं करूनही आस
रडत होता आकांताने नव्हते प्राणवायू
झाडांची कापणी भारी पडली त्यास

सजग होऊन प्रण करू आपण
समोरच्या पिढीला पर्यावरणाचा धडा देऊ
ऐकू आकांत मातेचा तिला सांभाळू
मुलांच्या जन्मदिनी रोपटे भेट देऊ

रंजना भैसारे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here