
आज दी.05/06/2025 ला अंतरराष्ट्रीय मानव अधिकार फेडरेशन ची नविन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सुनीता पांडे यांच्या निवास स्थानी कार्यकारिणीची सभा घेण्यात आली. या कार्यक्रमा अंतर्गत नवनिर्वाचित विदर्भ अध्यक्ष श्रीमती. मीरा भट्ट, तालुका अध्यक्ष सुनीता पांडे, तालुका सेक्रेटरी कु. आंचल मेश्राम यांची नियुक्ती, प्रदेश अध्यक्ष माननीय इरफान भाई मलनस यांच्या मार्गदर्शना खाली व माजी अध्यक्ष अर्चना डुंभरे यांच्या उपस्थिती त नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 10वी व 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांनचा सत्कार व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून छायादार वृक्ष वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रयास बचत गट, अनुभूती बचत गट, शिवाय बचत गट,तसेच रुद्राणी भजन मंडळ यांना वृक्ष वितरण करण्यात आले, सोबतच दहावी, बारावी चे विद्यार्थी 1) साई बेलूरकर दहावी 96% 2) चारुल गोडबोले दहावी 83% 3)प्रथमेश मोहतुरे बारावी 74% 4) तोषिका डेरकर दहावी 72% 5) आर्य मेश्राम दहावी 70% या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू भेट देऊन पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला श्रीमती. माधुरी ताई गहाणे (प्रयास बचत गट अध्यक्ष), सौ. मंगला ताई नाकाडे (अनुभूती बचत गट अध्यक्ष), सौ. प्रतिभा ताई गीरी (शिवाय बचत गट अध्यक्ष), सौ. संध्या ताई पिकलमुंडे (रुद्रानी भजन मंडळ अध्यक्ष) यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,तसेच आंतरराष्टीय मानवाधिकार फेडरेशन चे सर्व सदस्य सहभागी होते. त्याच प्रमाणे सर्व बचत गटातील सदस्यांनी सहयोग व उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे संचालन मीनल लिमजे एक्झिक्यू टिव्ह सदस्य मानव अधिकार फेडरेशन यांनी केले, तर आभार प्रदर्शन आंचल मेश्राम यांनी केले, राष्ट्रागीता नंतर अल्पहार व कार्यक्रम समाप्ती करण्यात आली.















