सचिन ठक तालुका प्रतिंनिधी, चंद्रपुर 7517045567 – चंद्रपूर – दि. 12 जून : समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन व चौथा सोमवार तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी 16 जून 2025 रोजीचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.

