prabodhini news logo
Home घुग्घुस सत्य शिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे एक दिवसीय धरणा आंदोलन

सत्य शिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे एक दिवसीय धरणा आंदोलन

0
179

घुग्घुस – आज दिनांक 9 62025रोज सोमवार ला शासन प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन विनंती करण्यात आली. घूगूस येथे राजिव रतन चौक घूगूस येथिल नव्याने सुरू असलेल्या उड्डाण पूलाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव देण्यात यावे परंतु आजपर्यंत प्रशासनिक यंत्रणेने कुठलेही नाव दिले नाही त्यामुळे शासन प्रशासनाच्या विरोधात सत्य श्री गुरुदेव सेवा मंडळ समस्त गुरुदेव सेवा मंडळ भजन मंडळ सामाजिक धार्मिक मंडळे राजकीय मंडळे राष्ट्रीय पार्टीचे मंडळे व सर्व परिसरातील गुरुदेव भक्त महिला मंडळ भजन महिला मंडळ दुर्गा मंडळ गणेश मंडळ व समस्त गुरुदेव प्रेमी गुरुदेव भक्ताच्या प्रमुख उपस्थितीत त्या ठिकाणी बोंबले पेट्रोल पंप उडान पुलावर एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले सदर धरणा आंदोलनादरम्यान उपोषण करते सन्माननीय मधुकर जी मालेकर साहेब सन्माननीय नारायणजी ठेवणे साहेब सन्माननीय जेणेकरून साहेब सन्माननीय गणेशजी शेंडे साहेब सन्माननीय गणेशजी भजे सन्माननीय ढवस साहेब सन्माननीय संजयजी भोंगळे साहेब निळकंठ नांदे साहेब या सर्वांनी पुष्पमाला घालून गुरुदेवाला वंदन करून एक दिवसीय धरणा आंदोलन सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन केले सदर आंदोलनादरम्यान राजकीय पक्षाचे नेते सामाजिक पक्षाचे नेते विविध संघटना यांनी आपले समर्थन पत्र या उपोषण मंडपी दिले व जोपर्यंत वंदनीय राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज यांचे नाव उडानपुराला शासन देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली व गावातील जवळपास 50 ते 52 संस्थानी या ठिकाणी वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराज उडान पूल व्हावे त्यांचे नाव मिळावे यासाठी सुद्धा आपले समर्थन पत्र दिले व आपले मनोगत सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केले सदर कार्यक्रमांमध्ये शेकडो गुरुदेव भक्त महिला मंडळी आवर्जून उपस्थित होते प्रशासनाला वारंवार दाद मागत होते की वंदनीय राज संत तुकडोजी महाराज यांचे नाव सदर उडानपुलाला देण्यात यावे यासंदर्भात मान्य ठाणेदार साहेब यांच्यातर्फे सुहास मेजर जी यांना निवेदन देण्यात आले व मुख्याधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले व सदर निवेदनामध्ये या सूचना करण्यात आल्या की त्या ठिकाणी ज्या समाजकंटकाने पूर्वी काही बॅनर लावले आहे ते त्वरित काढण्यात यावे व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा यानंतर आम्ही कुठलेही आंदोलन न करता त्या ठिकाणी वंदनीय संत तुकडोजी महाराज यांचे नाव लिहिणार येत्या पंधरा दिवसापर्यंत जर आम्हाला प्रशासनाने दाद दिली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here